देशात 15 दिवसांचे लॉकडाऊन लागणार?  कॅटची केंद्र सरकारकडे आग्रही मागणी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

देशात 15 दिवसांचे लॉकडाऊन लागणार?  कॅटची केंद्र सरकारकडे आग्रही मागणी

नवी दिल्ली, (प्रबोधन न्यूज) - कोरोनामुळे आतापर्यंत देशात 2 लाख 22 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनची मागणी वेगाने वाढू लागली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापार संघटनेने म्हटले आहे की, कोरोनामुळे पूर्णतः कोसळलेला व्यापार आणि अर्थव्यवस्था, तसेच कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या दुर्घटनांमध्ये अधिक महत्त्वाचे काय हे आता केंद्र सरकारला ठरवावे लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशात कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 3,57,229 नवीन रुग्ण आढळलेत. या काळात कोरोनामुळे 3,449 लोकांचा मृत्यू झालाय. या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनाची प्रकरणे आतापर्यंत 2,02,82,833 वर पोहोचलीत. कोरोनामुळे आतापर्यंत देशात 2 लाख 22 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनची मागणी वेगाने वाढू लागली आहे.

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, ही आकडेवारी केवळ देशाची अर्थव्यवस्थाच कमजोर करीत नाही, तर देशांतर्गत व्यापारही उद्ध्वस्त करतेय. भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेसाठी मनुष्यबळ उपलब्ध असणे आवश्यक आहे. तसेच ते अर्थव्यवस्था आणि व्यवसायाइतकेच महत्त्वाचे आहे.

वेळेत निर्णय घेण्याची आवश्यकता
कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीकडे लक्ष वेधून कॅटने सावधगिरी बाळगली आहे. जर वेळेत कोरोनाला नियंत्रित केले नाही तर येत्या काळात देशाला आणखीन कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. वैद्यकीय सुविधा वाढविणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही कॅट अधिकाऱ्यांनी केंद्राच्या निदर्शनास आणून दिले. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन, बेड आणि औषधांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

विरोधकांचीही लॉकडाऊनची मागणीही
देशात संपूर्ण लॉकडाऊन लादण्याची मागणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारकडे केलीय. कोरोनाला सामोरे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संपूर्ण लॉकडाऊन लादणे आणि सरकारने लवकरात लवकर लॉकडाऊन लावले पाहिजे, असंही ट्विट करत त्यांनी सांगितलंय.